गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने बँक आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत सोलापूर डीसीसी बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत गवळी वस्ती परिसरातील महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळेस बँकेच्या अधिकाऱ्यांनी बचत गट कसा स्थापन करावा व कर्ज कसे घ्यावे याची माहिती देण्यात आली. प्रारंभी मंडळाचे संस्थापक महादेव गवळी यांच्या हस्ते सर्व बँक अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महिला होम मिनिस्टर बरोबरच त्या फायनान्स मिनिस्टर सुद्धा आहेत. त्यामुळे नवऱ्याने दिलेल्या घर खर्चाच्या पैशातून व्यवस्थित नियोजन करून नेहमी बचत करत असतात म्हणून त्यांना जर आपण बचत गटाच्या माध्यमातून कर्ज दिले तर ते व्यवस्थित कर्जाचे हप्ते फेडू शकतात तसेच गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने आमच्या परिसरामध्ये कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आमच्या लोकांना आपल्या बँकेकडून सहकार्य करावे अशी विनंती केली.
डीसीसी बँकेचे भडंगे, शाखा अधिकारी राजेश गवळी, सतीश गुंजे, तात्या भोसले, चौगुले, नदा मॅडम तसेच मंडळाचे शामराव गांगर्डे, लहू गायकवाड, शेखर कवठेकर, अरविंद गवळी, संदीप काशीद, प्रशांत भगरे, अर्चना गवळी, गीता पवार, हभप अरुंधती गवळी, मंदोदरी निंबाळकर, दिपाली कवठेकर, रूपाली बचुटे आदीसह महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.