सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ग्रंथालय असल्यामुळे या ठिकाणी ग्रंथालय चळवळ उभा राहिली परंतु ग्रंथालय चळवळ आणखीन पुढे नेण्यासाठी तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची खरी गरज असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी यशदा अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने यशदा अभ्यासिकेचे उद्घाटन प्रसंगी रस्तोगी हे उदघाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार तर ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रधान सचिव रस्तोगी म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याकडे रवाना होतात. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाप्रमाणे अभ्यासिका तालुका पातळीवर आणि गावागावात निर्माण झाल्यास निश्चितपणे ग्रंथालय चळवळी याला सुद्धा वेग येईल. नुसती सभासद संख्या आणि पुस्तक संख्या मोठी असेल तर ते ग्रंथालय मोठे मी मानत नाही कारण ग्रंथालय ही एक चळवळ असून त्या ठिकाणी असणारा वाचक वर्ग आणि ग्रंथालयाने वाचकाला वाचन चळवळ उभी राहण्यासाठी दिलेली प्रेरणा यातूनच ग्रंथालय चळवळ जोमाने उभा राहील.
शासनाची मदत शंभर टक्के मिळाली तरी ग्रंथालय चळवळ राहणार नाही तर ती शासकीय ग्रंथालय होतील. आपल्याला ग्रंथालय ही चळवळच म्हणून कार्यरत राहिली पाहिजे त्यासाठी अशा अभ्यासिका गावागावात निर्माण करून नवीन पिढीच्या हातात पुस्तक दिले पाहिजे.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार म्हणाले, ग्रंथालय चळवळ जोमाने उभी करण्यासाठी 288 आमदारांना या चळवळीचे महत्त्व पटवून देणार असून त्यासाठी बैठा सत्याग्रह उभा करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं. प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी वाचनालय जोमाने वाढवण्यासाठी अनुदान वेळेवर मिळण्यासाठी सकारात्मक काम करावं व वर्धा या ठिकाणी येण्याचं आमंत्रण त्यांनी दिलं.
राज्य ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर म्हणाले की, शहराकडे जाणारा विद्यार्थ्यांचा ओघ थांबवण्यासाठी अशा प्रकारच्या अभ्यासिका तालुका पातळीवर आणि गावागावात निर्माण होण्याची खरी गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. डिजिटल क्रांतीमुळे म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये वाचक संख्या कमी होऊ लागलेली असल्यामुळे ग्रंथालय चळवळीला नवनवीन कौशल्य दाखवून चळवळ पुढे न्यावे लागणार आहे त्यासाठी चांगले काम करण्याची गरज असल्याचे शेवटी बोलताना क्षीरसागर यांनी सांगितले.
याप्रसंगी ग्रंथमित्र कुंडलिक मोरे व हरिदास रणदिवे यांनी आपले विचार व्यक्त केले. दरम्यान सिंहगड कॉलेजचे प्राचार्य शंकर नवले, काशिनाथ भतगुणकी, शरद सलगर व चवरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक संचालक शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, ग्रंथमित्र राम मेकाले, जयंत आराध्ये, गुलाबराव पाटील, श्रीकांत येळेगावकर, जिल्हाध्यक्ष विजयकुमार पवार, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, कार्यवाह साहेबराव शिंदे, दत्ता मोरे, अड. संगीता कुमठेकर, प्रकाश शिंदे, संजय सुर्यवंशी, प्रमोद पाटील, प्रदिप गाडे, सोपान पवार, भास्कर कुंभार, विनोद गायकवाड, वृशाली हजारे, सारीक मोरे, सारीका माडीकर, दिपाली नरखेडकर, गीतांजली गंभीरे, नंदा कुर्ले, राजश्री माशाळकर यांच्यासह ग्रंथालय चालक, सेवक वर्ग व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार यांनी तर आभार प्रदर्शन कार्यवाह साहेबराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब चटे यांनी केले.