सोलापूर – स्वच्छ भारत दिवस २०२३ च्या निमित्ताने सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमा निमित्त आज जिल्हात घेणेत आलेल्या श्रमदान मोहिमेत लाखो लोकांनी श्रमदान केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शना खाली हजारो हात आज स्वच्छतेसाठी राबले. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये आज कचरा व प्लास्टिक चे संकलन करणेत आले.
जिल्हयात आज सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायती मध्ये शासकीय कार्यालये व परिसर तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणेत आली.
स्वच्छता हि सेवा कार्यक्रम ग्रामपंचायत महूद घेणेत आलेल्या कार्यक्रमास उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) इशाधीन शेळकंदे, गट विकास अधिकारी आनंद लोकरे, सरपंच ग्रामपंचायत महूद सौ. संजीवनी कल्याण लुबाळ, कासाळ गंगा प्रकल्प समन्वयक बाबासाहेब ढाळे, मनुष्य बळ विकास सल्लागार शंकर बंडगर, विस्तार अधिकारी (पंचायत)अमोल तोडकरी आरोग्य पर्यवेक्षक मिलिंद सावंत, जिल्हा दुध संघ संचालक बाळासाहेब पाटील, महादेव येळे, श्रीमंत बंडगर, बाळासाहेब शिंदे, ग्रामविकास अधिकारी, खानसाब मुलानी ग्रामविकास अधिकारी, शंकर मेटकरी ग्रामविकास अधिकारी, आत्माराम कोळी ग्रामविकास अधिकारी, जयवंत लवटे ग्रामसेवक, मंगेश पोरे ग्रामसेवक, अनिकेत जगताप गट समन्वयक व साईत्री गायकवाड समूह समन्वयक प.स. सांगोला. रवींद्र लवटे उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील महुद येथे आद स्वच्छता ही सेवा हा उपक्रम जिल्हा स्तरीय उपक्रमांत उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी स्वच्छतेची शपथ ग्रामस्थांना दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज विशेष मोहिम राबविणेत आली.
जिल्हयात विशेष मोहिमे साठी उप मुख्य कार्यकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, मनुष्यबळ सल्लागार शंकर बंडगर, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे, सनियंत्रण सल्लागार यशवंती धत्तुरे, वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी, प्रशांत दबडे , मुकूंद आकुडे यांचे सह सर्व विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व सरपंच तसेच महिला व बाल कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी या मोहिमे साठी सहभागी झाले होते.
शेळकंदे यांनी केला सफाई कर्मचारी यांचा गौरव
………………….
स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत आद उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे हे सहकुटुंब या मोहिमेत सहभागी झाले होते. आद प्लास्टिक कचरा संकलन करीत असलेल्या सफाई कामगार यांना बोलावून घेऊन त्यांनी यथोचित सत्कार केला. या झालेल्या गौरवा मुळे सफाई कामगार भारावून गेले.
खऱ्या अर्थाने स्वछतेचे काम करणारे सफाई कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. श्रीम.जमीना तुकाराम गोसावी व श्रीम.शालन दीपक जाधव यांचा शेळकंदे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, यांनी तसेच अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) अमोल जाधव यांनी केले आहे.