राज्यात लौकीक असलेल्या ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेत श्री.गणरायाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. बँकेचे मार्गदर्शक तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते आरती करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बप्पा मोरयाच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना दिलीप माने यांनी राज्यांमध्ये भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव असे साकडे श्री गणरायाच्या चरणी घातले.
यावेळी बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष निलेश बाबर, सेवक संचालक चंद्रकांत म्हेत्रे, पांडुरंग झालटे, सरव्यवस्थापक विनोद कुलकर्णी, शाखाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.