सोलापूर : सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास अतिरिक्त पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या कडून पदभार घेतला. बुधवारी राज्य गुप्तवार्ता मुंबई विभागाचे उपायुक्त राजेंद्र माने यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती झाली होती.
पदभार घेतल्यानंतर पोलीस आयुक्त माने म्हणाले, 2009 ते 2012 या तीन वर्षात मी सोलापूरमध्ये उपायुक्त पदावर काम केले आहे. सोलापूरच्या जनतेचा मला चांगला अंदाज असून सोलापूर शहरात सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात त्यामुळे मला सोलापूरचा अनुभव असल्याने येणाऱ्या काळात सोलापूर मध्ये चांगली पोलिसिंग करू असा आशावाद व्यक्त केला.