सोलापुरात दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने ‘शासन दिव्यांगाच्या दारी’ हा अतिशय मोठा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष नामदार बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर जिल्ह्यातून तब्बल दहा हजारहून अधिक दिव्यांग बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
कार्यक्रमाची भव्यता आणि दिव्यांग बांधवांची गर्दी पाहून स्वतः बच्चू कडू भारावून गेले. आमदार बच्चू कडू सहसा कोणत्याही अधिकाऱ्यांचे कौतुक करत नाहीत परंतु त्यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे अभिनंदन केले. विशेष करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या बाबत बोलताना अशा जिल्हाधिकाऱ्याला मी खांद्यावर घेईन या शब्दात कौतुक केले.
ते म्हणाले, सांगली नंतर सोलापूरचा अतीशय सुंदर कार्यक्रम झाला. udid कार्ड वाटप करणारा सोलापूर जिल्हा पाहिला ठरला पाहिजे, माझा सीईओ आणि जिल्हाधिकाऱ्यांवर प्रचंड विश्वास आहे, चांगले अधिकारी मिळणे भाग्य लागते परंतु मी जिल्हाधिकारी यांचं गडचिरोलीमध्ये काम पाहिले आहे, अधिकारी संवेदनशील आहे. मी सहसा कोणत्या अधिकाऱ्यांला चांगलं म्हणत नाही, माझा तसा स्वभावही नाही परंतु चांगला भेटला तर त्याला खांद्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. नक्की काय म्हणाले बच्चू भाऊ पहा हा व्हिडिओ…