सोलापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र पाठवून त्यांचे अतिउत्कृष्ट कामा बद्दल विशेष अभिनंदन केले आहे.
या पत्रात अध्यक्षा चाकणकर यांनी…..
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या वर्षाची आषाढी वारी ही ‘आरोग्य वारी’ असावी व त्यासाठी आवश्यक त्या सूचना कार्यान्वयन यंत्रणांना दिल्या होत्या. आरोग्य वारीच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाची मी दि. ७.७.२०२२ रोजी सोलापूर जिल्हयातील वेळापूर ते भंडीशेगाव या वारी मार्गावर पाहणी केली. स्थानिक ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग यांनी वारीतील महिला भगिनींना केंद्रस्थानी ठेवून केलेले नियोजन हे अतिशय उत्कृष्ट होते.
महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून मी आपले व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करते व पुढील कामासाठी आपणांस शुभेच्छा देते.