सोलापूर : सात रस्ता भागातील मोदी परिसरात राहणारी 21 वर्षीय युवती घरातील तीन लाखाची रोकड व सोन्याचे दागिने घेऊन रविवार 10 जुलै रोजी घरातून निघून गेली आहे. ती अद्याप परतली नाही. आई वडिलांनी दोन दिवस इतस्त्र पाहणी केली, नातेवाईकांकडे शोधले मात्र तिचा पत्ता लागला नाही.
शेवटी आईने सदर बझार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. रंग गोरा, अंगावर कपडे निळ्या रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेजिन्स, डोळ्यावर चष्मा, भाषा मराठी व हिंदी बोलता येते. कुणाला दिसल्यास अथवा आढळल्यास सदर बझार पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.