

भाजपच्या भांडणात आनंद दादा पॅनल काढणार ; विकासकामे अन् पर्सनल अटॅचमेंट जमेची बाजू
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश नेते तर आता माजी गटनेते आनंद चंदनशिवे हे चौथ्यांदा महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी सलग तीन वेळा हे विजयी झाले आहेत. यापूर्वी ते बहुजन समाज पार्टी कडून निवडून यायचे यावेळी मात्र ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली आहे. प्रभाग पाच मधून आनंद चंदनशिवे यांनी संपूर्ण पॅनल राष्ट्रवादीकडे घेतले आहे. त्यांच्या सोबतीला बाळे येथील गणेश पुजारी असून या प्रभागात भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारीवरून प्रचंड वाद उफाळून आला. पक्षातून बंडखोरी झाली. बाळे परिसरातून राजू आलुरे यांनी बंडखोरी केली आहे.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीदरम्यान ओपनपणे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणारे उघडपणे आमदार विजयकुमार देशमुख यांना पाडा म्हणून लोकांसमोर दंडवत घातलेले बिज्जु प्रधाने यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
अशा एकूणच वातावरणात इलेक्शन होत असून आनंद चंदनशिवे यांनी मागील नऊ वर्षात आपल्या प्रभागात केलेली शेकडो कोटींची विकास कामे ही त्यांची प्रचंड जमेची बाजू आहे. नागरिकांच्या हाकेला अडचणीला कायमच धावून जाणारे म्हणून चंदनशिवे यांची ओळख आहे. त्यामुळे आंबेडकरी, मातंग, मारवाडी, लिंगायत, धनगर, मराठा, मुस्लिम समाजात त्यांची सध्या छाप पाहायला मिळते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याशी थेट अटॅचमेंट असल्याने ते विकास निधी खेचून आणू शकतात.
प्रचारादरम्यान स्वतः नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येकाच्या हाकेला धावून येता, चांगली कामे करता, त्यामुळे येण्याची गरज नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे नागरिक म्हणत होते. हीच चंदनशिवे यांच्या कामाची पावती म्हणावी लागेल.






















