




दादांच्या राष्ट्रवादीची ती ‘दिदी’ आपल्या वडिलांसोबत भाजपात दाखल
सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार दिलीप माने तसेच सोलापूरच्या भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत महानगरपालिका निवडणुकीत विश्वासात न घेतल्याने आपल्या शहर युवती अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या किरण माशाळकर यांनी आपले वडील माजी नगरसेवक नारायण माशाळकर यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यानच किरण माशाळकर यांनी आपल्या युवती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतरही त्यांना कुणी थांबवले नाही त्यामुळे नाराज झालेल्या किरण माशाळकर यांनी उघडपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास सुरुवात केली दरम्यान त्यांनी थेट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे, आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. सकाळीच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला त्यांचा उमेदवार रिंगणातून बाहेर निघून थेट त्याने भाजपचे उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.






















