कुठनं आणलं रे ह्याला ! सोलापुरात पाकिस्तान असल्याची भाषा ; ह्यानं दिलीप मानेंचीच घालवली
सोलापूर : सोलापुरात दिलीप माने यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. एकूणच राजकीय वातावरण पाहता दिलीप माने यांनी ही भूमिका घेतली, त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
दिलीप माने म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्व, सर्वाधिक मुस्लिम समाज दिलीप माने यांना लाईक करतात. बाजार समितीचे सभापती असल्याने तर त्यांच्यावर मुस्लिम समाज प्रचंड प्रेम करतो. ते त्यांच्या सुखदुःखात जातात, सहकार्य करतात.
त्यांच्याच कोट्यातून स्वप्नात नसताना सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळालेले प्रभाग क्रमांक 25 चे उमेदवार नागेश ताकमोगे यांनी मात्र एका माध्यमाशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मी हिंदुत्ववादी आहे, पूर्वी शिवसेनेत होतो, बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक होतो पण नाती जपावी लागतात म्हणून दिलीप माने यांच्या सोबत गेलो, पाहुणे पण आहे ते. आता मी त्यांनाच भाजप मध्ये आणलो, आम्ही हिंदुत्ववादाचे रक्षण करणारी माणसं आहोत, बाजूला आमच्या पाकिस्तान आहे, पाकिस्तानच्या बॉर्डरवर मी आहे त्यांच्या संरक्षणासाठी सदैव खंबीर असल्याची भाषा केली आहे.
या वक्तव्याने सध्या सोशल मीडियावर चर्चेचे गुन्हाळ उडाले आहे. जिथे ताकमोगे यांनी शेजारी पाकिस्तान आहे अशी भाषा केली त्याच प्रभाग क्रमांक 20 मध्ये भारतीय जनता पार्टीने तब्बल तीन उमेदवार मुस्लिम समाजाचे दिले आहेत. मग भाजप ताकमोगे यांच्या भाषेतील पाकिस्तान मध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार कसा देऊ शकतो. भाजपने प्रभाग क्रमांक 22, 17, 14,16 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार असलेल्या भागात चार उमेदवार दिले आहेत. तिथेही भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता यावर आता पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.





















