एकटा पैलवान एमआयएमला भारी ; अससुद्दिन ओवेसींनी वाढवली पैलवानची क्रेझ !
सोलापूर : यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत सोलापुरात अजित पवार विरोधात एम आय एम नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक मुस्लिम उमेदवार या निवडणुकीत उभे केले आहेत त्यामुळे त्यांचा फोकस हे सर्व उमेदवार निवडून येण्याकडे आहे परंतु त्यांना अडचण एमआयएम या पक्षाचे आहे आणि एमआयएम पक्षाला सुद्धा अजित पवारांच्या उमेदवारांचे टेन्शन आहे.
अजित पवार यांच्या पक्षातून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते निवडून आल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळून प्रभागात विकास कामे होणार आहेत यामुळे एमआयएमला टेन्शन आल्याचे बोलले जाते.
एम आय एम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना दोन वेळा सोलापुरात सभा घ्याव्या लागल्या. एक सभा सार्वजनिक झाली मात्र दुसरी सभा केवळ माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या प्रभागात घ्यावी लागली. यामुळे तौफिक शेख यांची क्रेझ स्वतः ओवेसी यांनी वाढवण्याचे बोलले जात आहे.
अनेकांच्या मते तर एमआयएम नेत्यांकडून तौफिक शेख यांचा किती तिरस्कार आहे यावरून दिसते असे बोलले जात आहे.
त्यामुळे एकटा तौफिक शेख सध्या एमआयएम वर भारी पडत असल्याचे दिसत आहे.
2017 च्या निवडणुकीमध्ये याच ओवेसी यांनी सोलापूरकरांना स्वच्छ पाणी, हॉस्पिटल सेवा, चांगले रस्ते, दिवाबत्ती ह्याच आश्वासन दिले होते. तेच मुद्दे पुन्हा ते नई जिंदगीच्या सभेत बोलले आहेत.
मागील वेळेस सोलापूरकरांनी नऊ नगरसेवक पक्षाला निवडून दिले किती विकास या पक्षाच्या माध्यमातून झाला हा प्रश्न जनता उपस्थित करत आहे.
फारुख शाब्दी यांनी अचानक पक्षाचा राजीनामा दिल्याने सुद्धा एमआयएम डॅमेज झाल्याचे चित्र आहे. पक्षाचा सेनापतीच सोलापुरात नसल्याने स्वतः पक्षप्रमुख खासदार अससुद्दिन ओवेसी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला तब्बल दोन सभा तीन दिवसात घ्याव्या लागल्या यावरून पक्ष किती डॅमेज झाला आहे याची प्रचिती येते.





















