
प्रभाग 21 मध्ये घुमतोय “उपरा नको, स्थानिक हवा” चा नारा! अडीच कोटी विकासकामांच्या जोरावर शिवसेना जनतेसमोर
सोलापूर : “स्थानिक आहे, काम करत आलोय, काम करत राहणार” उपरा नको, स्थानिक हवा” असा नारा देत एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रभाग क्रमांक 21 मध्ये जनतेसमोर जात असून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत मिळत आहे.
कुमठा नाका परिसरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन अक्षय उज्वल पकाले, मीना रविकिरण दास, पूजा उत्तमप्रकाश खंदारे आणि शिवसेना पुरस्कृत संतोष सुभाष भोसले हे चार उमेदवार रिंगणात आहेत.
या प्रभागात शिवसेना, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष यांच्यात तिरंगी सामना होत आहे. माजी जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या प्रभागात निवडणुकीला सामोरे जात असून उमेदवार स्थानिक देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काळजे यांनी तब्बल अडीच कोटीचा विकास निधी आणून कामे केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कुमठा नाका परिसरातील अंतर्गत रस्ते, जयभवानी, गुमास्ता सोसायटी बगीचा सुशोभीकरण, लक्ष्मी विष्णू सोसायटी पाइपलाइन, कुमठा नाका परिसरात पाईपलाइन, साधू वासवानी बगीचा सुशोभीकरण, गुरुनानक चौक ते कुमठा नाका लाईट पोल बसवणे अशी तब्बल अडीच कोटींची विकासकामे कामे केली आहेत. हीच या प्रभागात शिवसेनेची जमेची बाजू आहे.
काँग्रेसमध्ये असलेले काही उमेदवार उपरे आहेत, भाजपचे तर सर्व पॅनल उपरे असल्याने शिवसेनेला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय त्यामुळे उपरा नको, स्थानिक हवा असा नारा दिला आहे.




















