सोलापुरात काँग्रेस होऊ लागला अल्प ; नाराज अल्पसंख्यांक युवकाध्यक्षाचा राजीनामा
सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये अनेकांना उमेदवारी मिळाली नाही. भविष्यात महापालिकेचे तिकीट मिळेल या आशेने आलेल्या अनेकांच्या आशेवर पाणी फिरले गेले. अशीच गत काँग्रेस पक्षात सुद्धा झाली त्यामुळे नाराजांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचे पडसाद उमटत असून राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
दोन ते तीनच महिन्यापूर्वी एम आय एम पक्ष सोडून काँग्रेसचा शेला गळ्यात घेतलेले मोहसीन मैंदर्गीकर यांनी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष पदाचा थेट राजीनामा दिला आहे.
मोहसीन मैंदर्गीकर हे प्रभाग 14 आणि प्रभाग नऊ मधून इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही एकीकडे काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत अशात ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांना जर उमेदवारी दिली जात नसेल तर पक्षात राहून काय फायदा असा नाराजीचा सूर व्यक्त करत मोहसीन मैंदर्गीकर यांनी राजीनामा दिला आहे.





















