दिलीप मानेंकडे इच्छुकांची वर्दळ वाढली ! राजेश काळे सह युवराज राठोड यांनी घेतली मालकांची भेट
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोलापूर शहरांची समीकरणे बदलू लागली आहेत. आमदार सुभाष देशमुख समर्थक पण आपल्या खोड्यांनी अडचणीत आलेले माजी उपमहापौर राजेश काळे यांनी शनिवारी पहिल्यांदाच माने बँकेत जाऊन त्यांची भेट घेत भाजप प्रवेशाबद्दल सत्कार केला. त्यांना आपला कार्य अहवाल भेट दिला.
राजेश काळे यांचा प्रभाग 24 अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाला असून दुसऱ्या प्रभागात अनुसूचित जमाती सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.
सुभाष बापू राजेश वर नाराज असल्याने आता त्यांना तिकीटाची अडचण येणार आहे. म्हणून काळे यांनी इतर नेत्यांच्या माध्यमातून फोल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.


दुसरीकडे विधानसभा निवडणूक लढवणारे बंजारा समाजातील युवा नेते तथा सोनाई फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड यांनी ही दिलीप माने यांची भेट घेऊन सत्कार केला. भैय्या तसे दिलीप मालकांचे समर्थक मानले जातात. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला सहकार्य केले होते. ते प्रभाग 24 मधून इच्छुक आहेत. सोबत राजेश काळे यांच्या पत्नी आणि इतर दोन उमेदवार घेऊन प्रभाग 24 लढण्याची युवराज राठोड यांची तयारी आहे.
दिलीप माने भाजपमध्ये आल्याने विशेष करून शहर दक्षिण मध्ये राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत आहेत. त्यामुळे बापू गोटात टेन्शन असून माने गोटात सध्या तरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



















