सोलापूर जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यात मात्र सर्वच राजकीय नेत्यांनी गावोगावी गणेश मंडळाच्या पूजा केल्या. काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी तालुक्यातील अनेक गावी भेटी देऊन गणेश मंडळाच्या पूजेअडून आपला दक्षिण मतदार संघ पिंजून काढला.
मंद्रुप येथे गणेशोत्सवनिमित्त आयोजित डोळळीन गायन कार्यक्रमाचे उदघाट्न दक्षिण सोलापूरचे नेते सुरेश हसापुरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
त्यानंतर हसापुरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, आनंदनगर, बाळगी, सादेपुर, औज मंद्रूप आणी मंद्रुप येथील गणेश मंडळाना भेटी देत आरती व पूजा केली व सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते गुरु म्हेत्रे, मोतीलाल राठोड, लवगीचे सरपंच संगमेश बगले, युवा नेते अनंत म्हेत्रे व वाघेश म्हैत्रे, सादेपुर सरपंच चितापुरे, होटगी स्टेशनचे उपसरपंच सुभाष पाटोळे, लवंगी चे माजी सरपंच गुरु कोटलगी, भंडारकवठेचे सर्वेसर्वा रमेश पाटील, गोपाल जगंलगी, बाळगीचे सरपंच कोळी, आनंदनगरचे सोमनिग विरदे, संगु बिराजदार, नंदू वारे, पत्रकार अपु कस्तुरे, श्रीशैल बुगडे, कांतु बुगडे, ओंकार रजपुत, ओज मंद्रुप सरपंच केरके, परवेज काझी, मंडळाचे अध्यक्ष यल्लेश्वर बुध्दाळे, शावरेपा अदोडगी, शशीकांत अकुशे, संतोष बुगडे, असलम पटेल, बिरु बन्ने, कलय्या स्वामीसह सर्व गावातील गणेशोत्सव पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.