सोलापूर : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहरा जवळील असलेल्या कोंडी गावात मागील पाच दिवसापासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी 1. प्रकाश भोसले, 2. संजय भोसले, 3. सोपान पवार, 4. कालिदास चव्हाण, 5. अमोल पाटील, 6. शहाजी भोसले, 7. धनाजी मस्के, 8. महेश मुळे यांनी सहभाग नोंदविला.
ग्रामपंचायत पाकणी, पृथ्वीराज माने युवा मंच पाकणी, श्री शिवजन्मोत्सव सार्वजनिक मंडळ पाकणी, तालुका उत्तर सोलापूर यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले,
तसेच गावातील चांद इलाही सय्यद यांनी उपोषणाला पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली.