


अजित पवारांची साहेबांच्या लाडक्या काका साठेंवर स्तुतीसुमने ; काका म्हणजे….
सोलापूर : शरद पवार यांचे अतिशय घनिष्ठ आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे, “मरेपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार नाही” असे बोलणाऱ्या बळीराम काका साठे यांनाही परिस्थिती राजकीय वातावरण आणि नाईलाजाने साहेबांची तुतारी सोडून अजित दादा चे घड्याळ हाती घ्यावे लागले.
वडाळ्यामध्ये गुरुवारी ज्येष्ठ नेते काका साठे त्यांचे चिरंजीव जितेंद्र साठे, नातू जयदीप साठे यांच्यासह काकांच्या असंख्य समर्थकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी काका साठे यांनी अजित पवारांना आपल्या नातूची लग्नपत्रिका देण्याच्या उद्देशाने मुंबईला भेट घेतली होती त्यावेळी जवळजवळ साठे यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते.
काका साठे यांच्या प्रवेशानंतर अजित पवार यांनी त्यांच्यावर प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला. “काका साठे म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे जननायक असल्याची उपाधी दिली. काकांच्या समाजकारण आणि राजकारणाचा आदर्श घेण्याचे आवाहन ही पवार यांनी केले. पहा अजित दादा साठे यांच्या बद्दल काय म्हणाले….


















