
अजितदादा गुरुवारी सोलापुरात ; हा बडा अन् ज्येष्ठ नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
सोलापूर : नगरपालिका निवडणूक रंगतदार अवस्थेत असतानाच आणि मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीचा विषय गाजत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे हे गुरुवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या साहेबांची तुतारी सोडून हाती दादांचे घड्याळ घेणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच आमदार राजू खरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत बळीराम काका साठे यांनी आपल्या नातवाच्या लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे काका साठे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले होते.
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे विठ्ठल मंगल कार्यालय मध्ये सकाळी अकरा वाजता होणाऱ्या जाहीर सभेत काका साठे हे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत.





















