अजितदादा बाळराजेंना पदरात घ्या ; राजन पाटलांकडून दिलगिरी व्यक्त
सोलापूर : अनगर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत सर्वच्या सर्व सतरा जागा आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा निवडून आल्यानंतर मध्ये माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील अजिंक्यराणा पाटील यांनी जल्लोष साजरा केला.
या जल्लोषा दरम्यान बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवार यांना चॅलेंज करत अजित पवार नाद करायचा पण अनगरकरांचा नाही असे शब्द वापरले त्यानंतर बाळराजे येथे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. बाळराजे पाटलांवर टीकेची झोड उठली आहे.
सर्व स्तरातून होत असलेल्या एके नंतर स्वतः माजी आमदार राजन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करताना अजित पवार यांनी बाळराजे पाटील यांना आपल्या मुलाप्रमाणे पदरात घ्यावे अशी विनंती केली आहे.



















