‘काळे’च का रे बाबा ! तेव्हा राजेश आता नरेंद्र
सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीचे नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण सोडत पुन्हा काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने सोलापूर महापालिकेसह इतर काही महापालिकांची आरक्षण सोडत पुन्हा काढण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत ही सोडत झाली. यापूर्वी प्रभाग 24 मध्ये ओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडले होते. त्या जागेवर आता ओबीसी महिलेसाठी थेट आरक्षण पडले. यामुळे भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना धक्का बसला त्यांनी आयुक्तांकडे या प्रक्रियेला विरोध केला. आणि हरकत घेतली. आरक्षण सोडतीवर नाराजी व्यक्त करताना प्रभाग 24 चे आरक्षण सोडत चिठ्ठी द्वारे काढण्याची मागणी केली.
पण आयुक्तांनी नंतर हरकत घ्यावी असे सांगितले.
यानंतर काळे नाराज होऊन निघून गेले. प्रभाग पंधरा मधील सर्वसाधारण महिलेचे आरक्षण हे ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यावर ही भाजपचे किरण पवार यांनी हरकत घेतली.
पहिल्या आरक्षण सोडतीत माजी उपमहापौर राजेश काळे यांचा 24 नंबर प्रभागातील अनुसूचित जमाती आरक्षण महिलेसाठी राखीव झाले. त्यामुळे त्यांचीही त्या प्रभागात अडचण झाली आहे.
2017 पेक्षा यंदा राजकीय परिस्थिती बदलली आहे दोन्ही देशमुख आमदार एकत्र असून त्यांच्या समर्थकांना वातावरण चांगले आहे त्यामध्ये नरेंद्र काळे यांचा समावेश होतो. पण सध्या भाजपमध्ये राजकीय कुरघोड्या वाढल्या असल्याने भविष्यात आणि कार्यकर्त्यांना तिकीट वाटपावेळी अडचण होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.


















