किसन जाधव यांच्या प्रभागात आज अल्पसंख्यांक सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन
सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून,सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्र. 22 चे माजी नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून 50 लाख रकमेचे “अल्पसंख्यांक समाजाचे जन्नतुल फिरदोस कब्रस्तान सांस्कृतिक भवन” या बांधकाम कामाचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
हा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे किसन जाधव यांनी सांगितले.





















