अय्यो हे काय ! भाजपच्या कार्यकर्त्यांचे भाजपच्याच कार्यालयासमोर आंदोलन
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर सोलापूर शहरात अनेक राजकीय बदल होताना दिसत आहेत बरीच राजकीय समीकरणे सुद्धा बदलली जात आहेत. केंद्र आणि राज्यात सत्तेमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीत सध्या दोन देशमुखांच्या विरोधात दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण सिटी आमदार देवेंद्र कोठे शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा स्वतंत्र गट आहे.
दरम्यान चारच दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उघडपणे काम करणाऱ्या माझी सभागृह नेते सुरेश पाटील, बिजू प्रधाने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना भाजपने पुन्हा पक्षात घेतले आहे. त्यामुळे दोन्ही देशमुख सध्या अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. याच बरोबर आता माजी आमदार दिलीप माने, बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणजित शिंदे हे सुद्धा भाजप प्रवेश करणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.
पक्षामध्ये हे चालत असताना देशमुख समर्थकांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी या प्रवेशांना विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते आता हे आंदोलन करणार आहेत.
🔥 निषेध! निषेध! निषेध! 🔥
भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण विधानसभेतील कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन!
घोटाळ्यात बुडालेल्या , जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध.
💪 कार्यकर्त्यांच्या हितासाठी
💪 पक्षाच्या वाढीसाठी
💪 निष्ठावंताच्या हक्कासाठी
भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला आहे!
🗓️ दिनांक: 21 ऑक्टोंबर
📍 ठिकाण: भाजपा कार्यालय , सिव्हिल चौक , सोलापूर
⏰ वेळ: सकाळी 10 वाजता
चला, एकत्र येऊ —
“ कार्यकर्त्यांचा आवाज दाबू देणार नाही!”
“सत्यासाठी झुंज देऊ —
जय भाजपा!”