सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे दीपावली स्नेहमिलन उत्साहात
सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे दिवाळीनिमित्त दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम शनिवारी उत्साहात झाला. जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत झालेल्या कार्यक्रमास सभासद, खातेदार, ठेवीदार, हितचिंतक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले, सोलापूर जनता सहकारी बँक समाजातील सर्व आर्थिक स्तरातील घटकांना सोबत घेऊन काम करते. सहकाराच्या माध्यमातून समाजाची प्रगती होऊ शकते हे सोलापूर जनता सहकारी बँकेच्या प्रचंड कार्य विस्ताराच्या माध्यमातून वारंवार सिद्ध झाले आहे. दीपावली स्नेह मिलनाच्या माध्यमातून सोलापूर जनता सहकारी बँकेचे खातेदार, ठेवीदार, ग्राहक, सभासद तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांची हितगुज साधता आला याचे समाधान आहे, असेही सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितले.
यावेळी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक प्राचार्य गजानन धरणे, जगदीश भुतडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, माजी संचालक आणि सोलापूर जिल्हा सरकारी वकील ऍड. डॉ. प्रदीपसिंग राजपूत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सी.ए. सुनील इंगळे, शहर संघचालक राजेंद्र काटवे, अमर बिराजदार, शिशिर साठे, शिवाजी चव्हाण, सुभाष मठे, वैभव मेरकर, प्रवीण निकाळजे, भीमाशंकर टेकाळे, श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड, मल्लिकार्जुन बिराजदार, डॉ. नितीन बलदवा, सूर्यकांत कुलकर्णी, वैद्य डॉ. प्रशांत बागेवाडीकर, दिलीप पेठे, संजय रघोजी, विजयकुमार डांगे, प्रकाश विधानी, शांतीलाल सेठिया, संजीवकुमार जाधव, दिलीप केवळे आदी उपस्थित होते.