मुख्यमंत्र्यांनी दिलेत अधिकार, आता तुम्ही पाठीशी राहा ; दिलीप माने यांचे बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजप प्रवेश निश्चित केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांनी शनिवारी आपल्या ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या सभागृहात उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

या बैठकीला अविनाश मार्तंडे, संभाजी भडकुंबे, आप्पासाहेब काळे, एडवोकेट इंग्रजीत इंद्रजीत पाटील, बाबासाहेब पाटील, शुभांगी केंगार, श्रीराम पाटील, काशिनाथ माने, नामदेव गवळी, बाळासाहेब सुरवसे, शिवाजी पाटील, उमेश भगत, सुनील जाधव, बालाजी येलगुंडे, नागनाथ माने, शिवलिंग गौडा पाटील, गणपत बचूटे, उद्धव बंडगर विलास पाटील गोवर्धन जगताप जैनुद्दीन शेख, दिगंबर मेटे, श्रीकांत मुळे, विशाल भोसले, सुखदेव पवार, भारत तांबे, बाळासाहेब पाटील अंजली क्षीरसागर, तुकाराम चव्हाण अशोक गुंड ओंकार शिंदे काशिनाथ गौडगुंबे, सुनील भोसले, अनिल पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मालक तुम्हीच आमचा पक्ष आहात तुम्ही जाल तिथे पाठीमागे येऊ असे सांगताना कार्यकर्त्यांच्या इच्छेखातील तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण काँग्रेसने बेईमानी केली आता त्याच काँग्रेसला पलटी देण्याची वेळ आली आहे. दोन्ही तालुक्यात आपले गड शाबूत आहेत तुम्ही सहकारातील डॉन आहात तुमची किंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखली त्यांच्या शब्दाचा मान आपण राखला पाहिजे पण हे सर्व होताना तुम्हाला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी ही आमची अपेक्षा आहे.
कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर दिलीप माने भाजप प्रवेश करण्यामागील उद्देश्य स्पष्ट केला. कार्यकर्त्यांची कामे व्हावेत त्यांचा सन्मान व्हावा हा माझा कायमचा प्रयत्न असतो. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपणाला भेटायला बोलावले, भेट झाली, सर्व परिस्थिती त्यांच्या समोर सांगितली. तेव्हा त्यांनी “पालकमंत्री तुमचे मित्र आहेत, तुम्हाला सर्वाधिकार दिलेत, काळजी करू नका, अडचण आल्यास मी आहेच”. असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी खंबीर रहा असे आवाहन केले.