त्या सनातनी ‘राकेश किशोर’वर कारवाई करा ; काँग्रेस प्रदेश सचिव श्रीशैल रणधिरे यांची मागणी
सोलापूर : सोलापूर काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव श्रीशैल रणधीरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत त्या सनातनी राकेश किशोर वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर सनातन का अपमान नही सहेंगे असे म्हणत राकेश किशोरी याने बूट फेकला होता.
हा प्रकार घृणास्पद आणि लज्जास्पद असून देशाच्या संविधानाच्या विरोधात आहे. अशा प्रवृत्तीला देशभरातून विरोध झाला पाहिजे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध नोंदवतो असून त्या राकेश किशोर वर कठोर कारवाई करावी या मागणीचे पत्र रणधीरे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत पाठवले आहे.
राकेश किशोर याच्यावर देशद्रोह आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी रणधीरे यांनी केली आहे.