विमानाचे विचारून भरणे मामा हेलिकॉप्टरने सोलापूरला ; कार्यकर्त्यांना त्यांच्याच ब्लॅक अँड व्हाईट गाडीत बसून केले खुश, भाऊंचा सत्कारही घेतला
सोलापूर : राज्याच्या क्रीडा मंत्रीपदानंतर राज्याचे कृषिमंत्री पद मिळाल्यावर दत्तात्रय भरणे मामा हे पहिल्यांदाच सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येऊन गेले. मामांचा दौरा म्हणजे समर्थक कार्यकर्त्यांनी ऊर्जा देणारा ठरतो. शॉर्ट बट स्वीट असा दौरा भरणे मामांचा झाल्याचे दिसून आले.
येण्यापूर्वी त्यांनी आनंद चंदनशिवे यांना भरणे मामा यांनी सोलापूर मुंबई ही विमान सेवा सुरू आहे का? अशी विचारणा केली. विमानसेवा नसल्याने ते हेलिकॉप्टरने सोलापूरला आले.
यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश नेते आनंद चंदनशिवे, माजी गटनेते किसन जाधव, तौफिक शेख, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, नजीब शेख यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
विमानतळावरून हुतात्मा स्मृती मंदिर ला कृषी विभागाच्या कार्यक्रमाला जाताना त्यांनी संतोष पवार यांच्या ब्लॅक फॉर्च्यूनर मध्ये बसून प्रवास केला त्यानंतर हुतात्माचा कार्यक्रम संपल्यावर त्यांनी आनंद दादांच्या व्हाईट ईनोवामध्ये बसून ते विमानतळाकडे निघाले. मागच्या सीटवर आनंद चंदनशिवे, संतोष पवार, किसन जाधव हे बसले.
अशा धावपळीच्या दौऱ्यातील किसन जाधव यांनी भरणे मामांचा आजोबा गणपतीचा फोटो देऊन सत्कार केला.