पालकमंत्री सोलापुरातील पूरग्रस्त लाडक्या भाऊ बहिणींची दिवाळी DPC तून करणार गोड
सोलापूर : सोलापुरातील सीना नदीच्या पूरस्थिती नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देत मोठ्या पॅकेजची घोषणा केली. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
जयकुमार गोरे म्हणाले, सीना नदीच्या पुरामुळे दिवाळीच्या तोंडावर अनेक कुटुंब देशोधडीला लागले. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या परिस्थितीत सर्वांनीच चांगले काम केले त्यांचे मी आभार मानतो. विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी 31 हजार कोटींचे पॅकेज मंजूर केल्याबद्दल ही आभार व्यक्त केले.
त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही सोलापूर जिल्हा नियोजन समितीने निर्णय केला की,
बाधित कुटुंबाची दिवाळी आनंदाची व्हावी म्हणून 12500 कुटुंबाना दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे किट दिले जातील. आणखी काही लोकांना हे किट देता येतील का? हे ही आम्ही पाहतोय असेही त्यांनी सांगितले.
शासनाने दिलेली किट या पेक्षा पूढे जाऊन आम्ही लाडक्या बहिणीसाठी आम्ही वैयक्तिक पातळीवर मदत करता येते का यासाठीही आम्ही सर्व आमदार प्रयत्न करणार आहोत.