आष्टे गावाचे पुनर्वसन करा ; पूरग्रस्त ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात, ग्रामस्थ अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत
सोलापूर : भविष्यात पुन्हा सीना नदीच्या पुराचा धोका लक्षात घेता मोहोळ तालुक्यातील आष्टी ग्रामस्थांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करावे अशी मागणी पूरग्रस्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान आष्टी गावातील ग्रामस्थ अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली असून दानशूर लोकांनी सुमारे 200 लोकांना संसार उपयोगी साहित्य द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावातील लखन घाटे, रवींद्र नरुटे महादेव गावडे, उत्तम शेंडगे, संजय लोंढे, नामदेव नरुटे, सुनीता खरात, सविता कापुरे, विजया नरुटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना ग्रामस्थांनी अष्टे गावातील सर्वच नागरिकांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करावे आणि शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.