
श्रीकृष्ण गुरुकुल तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा विजेता ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सोलापूर : तालुका क्रीडा संकुल समिती उत्तर सोलापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धेमधील सतरा वयोगटाखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये श्रीकृष्ण गुरुकुल वाघोलीवाडी क्रिकेट संघ तालुकास्तरीय विजेतेपद पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. एच सी सी नान्नज प्रशालेला अंतिम सामन्यात हरवून श्रीकृष्ण गुरुकुल वाघोलीवाडी संघ विजेता ठरला.

या स्पर्धेत 24 संघ सहभागी झाले होते, श्रीकृष गुरुकुल संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत साखळी, उपांत्य आणि अंतिम सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला.

या विजेत्या संघात यश पवार कर्णधार, मनीष कटारे उप कर्णधार, प्रतीक नाईकनवरे, अथर्व गुंड, स्वप्निल थोरात, शंभुराजे कदम, राजवर्धन यमगर, शिवम सरडे, गणेश भोई, आर्यन सुपेकर, शरद पवार, शिवतेज पवार, शुभम पाटील, समर्थ निकम या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आवताडे, उपाध्यक्ष हनुमंत निकम, मुख्याध्यापक किशोर शिनगारे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत क्रीडा विभाग प्रमुख सुनील गरड व क्रीडा शिक्षक अण्णा कुलाल यांचे मार्गदर्शन लाभले.