सोलापूरकरांनो पुढील दोन दिवस धोक्याचे ! प्रशासनाला सहकार्य करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे कळकळीचे आवाहन ; 4002 जणांना बाहेर काढण्यात यश
सोलापूर : मागील चार दिवसांत सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या सहा तालुक्यातील तब्बल 88 गावे बाधित झाले असून या पुरातून 4002 नागरिकांना वाचविण्यात प्रशासन यशस्वी झाले. सुदैवाने या महापुरात जीवितहानी झाली नाही. याबद्दल NDRF टीमसह प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
https://fb.watch/CmcTPiL9kK/
दरम्यान येणाऱ्या दोन दिवसात सोलापूर, धाराशिव आणि अहिल्यानगर याठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, यावरून मोठ्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सीना नदीचे पाणी वाढून पूर येण्याची असल्याने सोलापूरच्या नागरिकांनी महसूल, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन केले.
निधीची कोणती कमतरता नाही, जनतेमधून मदत करायची असेल तर तालुका स्तरीय किंवा जिल्हास्तरीय परवानगीची गरज नाही असे सांगताना नागरिकांनी गहू पीठ, मच्छर अगरबत्ती, मेणबत्ती, कपडे, प्लास्टिक ताडपत्री, टॉर्च, जीवनावश्यक भांडे, साबण, बदली, मग, बिस्कीट पॅकेट, फूड पॅकेट, चादर, ज्वारीचे पीठ, हरभरा डाळ, मीठ, मसाला, हळद, तेल, सतरंजी, मिल्क पावडर हे द्यावे असे आवाहन केले.