सोलापुरात आनंददादांनी अडवला अजित पवारांचा ताफा ; तत्पर अजितदादांनी काय केले पहा
सोलापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त परिस्थिती पाहणी दौऱ्यावर निमित्त सोलापूर येथे आले होते.यावेळी जुना पुणे नाका येथे नाल्यात वाहत गेलेल्या रिक्षा चालक सतीश शिंदे यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे किसन भाऊ जाधव गणेश पुजारी यांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
दरम्यान अजित पवारांनी तातडीने संबंधित प्रशासनाला फोन लावून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
या निवेदनाद्वारे सोलापूर शहरातील शेळगी नाला जुना पुना नाका स्मशानभूमी जवळील नाल्यामध्ये शनिवार दिनांक १३/९/२०२५ रोजी रिक्षा चालक सतीश शिंदे राहणार मडकी वस्ती वारद फॉर्म पुना रोड सोलापूर हा छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते स्मशानभूमी मार्गावरून नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे रिक्षा घेऊन जात असताना जुना पुना नाका दगडी पुलावरील रस्त्याचे काम चालू असल्याने खड्डा मारला असून मागील आठवड्यात मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दगडी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवास चालू होता सदर दगडी फुलावर रिक्षाचालक सतीश शिंदे हा चालवत असलेला रिक्षा पुलावर आढळून आला परंतु सतीश शिंदे याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नाला परिसरामध्ये प्रशासनाकडून देखील अग्निशामक दल ,आपत्ती व्यवस्थापनकडील बोट, ड्रोन कॅमेरा द्वारे सर्वत्र शोध मोहीम घेण्यात आली परंतु तो कोठेहि आढळून आला नाही.
सदर व्यक्ती सतीश शिंदे यांच्या कुटुंबामध्ये आई-वडील बायको ७ वर्षाची मुलगी भाऊ, भावजय असा परिवार असून सतीश शिंदे यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सतीश शिंदे यांच्यावर होती सध्या त्याच्या कुटुंबास उदरनिर्वाहासाठी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
तरी प्रशासनाकडून प्राथमिक स्वरूपात सतीश शिंदे यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत देण्यात यावी तसेच सोलापूर शहरातील नैसर्गिक नाल्याचा करण्यासाठी बारामती च्या धर्तीवर कायमस्वरूपी उपयोजना करण्यात यावी व त्या संदर्भात आपल्या पक्षात विशेष बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.