“भाई, आता तुम्हीच मला वाचवा” सोलापुरात शिवसेना नेत्याला लागली कारवाई टाळण्याची ‘काळजी’
सोलापूर : सोलापूरच्या शहर पोलीस प्रशासनाने मागील दोन ते तीन वर्षात तडीपारीच्या आणि एम पी डी ए च्या अनेक कारवाया केल्या आहेत. त्यामुळे गल्लीतल्या गुंडांना जरब असल्याचे दिसून येते. आता सोलापूरातील शिवसेनेच्या एका माजी जिल्हाप्रमुखा विरोधात पोलीस प्रशासन तडीपारीची कारवाई करण्यासाठी प्रक्रिया करत असल्याच्या चर्चेने सोलापूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
त्या नेत्यांविरोधात फसवणूक, शासकीय कामात अडथळा आणणे, धमक्या देणे असे अनेक गुन्हे दाखल आहे. याच जिल्हाप्रमुखाने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना अनेक कारवाया टाळल्या होत्या. त्यावेळी भाईंचा एकच फोन आणायचा अन् पोलिसांना गप्प करायचे असे तब्बल दोन वर्ष चालले.
त्याचवेळी तो नेता पोलिसांच्या डोक्यात बसला होता. जर राज्यातील सत्ता बदलली असती तर त्याचवेळी चित्र वेगळे दिसले असते परंतु पुन्हा महायुतीचे सरकार आले खाकीचे हात बांधले गेले. प्रवास गणेशोत्सव दरम्यान पुन्हा त्याने त्यावर गुन्हा दाखल झाला शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
“आता बस झाले” म्हणत पोलिसांनी त्या नेत्याचा विरोधात तडीपारीची फाईल तयार केल्याचे समजते. आता या फाईलवर सोलापूरचे ‘राजकुमार’ आणि पोलिसांचा ‘विजय’ काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. त्यामुळे त्या नेत्याला”भाई, आता तुम्हीच मला वाचवा” असे म्हणत ही कारवाई टाळण्याची ‘काळजी’ लागल्याची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे.