श्रीशैल रणधिरे यांच्यावर काँग्रेसने दिली या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी
सोलापूर : काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक आणि नुकतच प्रदेश सरचिटणीस पदावर निवड झालेले श्रीशैल रणधीरे यांना पक्षाने जबाबदारी दिली आहे.
काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्याला एका प्रमुख नेत्याची निवड केली आहे त्यामध्ये सांगली जिल्ह्यासाठी माजी मंत्री तथा प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष रमेश बागवे यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी श्रीशैल रणधिरे यांची विधानसभा प्रभारी पदावर नियुक्ती झाली आहे.
सोलापूर शहरातील आंबेडकरी समाजातील नेत्याला विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदावर निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
दरम्यान या निवडी बद्दल रणधिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त केले, पक्षाने दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडणार असून लवकरच माजी मंत्री रमेश बागवे यांच्याशी संपर्क साधून खानापूर दौरा करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.