सोलापुरात शिवसेनेच्या नेत्याकडून कव्वालीची पेशकश ; समी मौलवीच्या पहिल्याच कार्यक्रमाची जोरदार मार्केटिंग
सोलापूर :
आसार मैदान उत्सव समितीच्या वतीने जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या महोत्सवात सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कव्वाल अनिस साबरी यांचा भव्य कव्वाली प्रोग्राम होणार आहे.
हा कार्यक्रम येत्या १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर शहरातील आसार मैदान येथे रंगणार असून, भाविकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. कव्वालीच्या माध्यमातून इस्लाम धर्माचा शांती, भाईचारा व एकतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मिलादुन्नबी निमित्त शहरात नानाविध सजावट, देखावे, जुलूस व धार्मिक सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनिस साबरी यांचा कव्वाली प्रोग्राम हा शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने तयारीत आहेत. शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे, शकील मौलवी, अय्युब कुरेशी, समी मौलवी, राजू कुरेशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.