
फारूक शाब्दि तुम्हाला सलाम ; मुंबईत मराठा बांधवांना पाठिंबा देत तुम्ही केली अशी सोय
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. या आरक्षणाच्या लढाईसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला आहे.
या आरक्षण लढाईला महाराष्ट्रातील संपूर्ण मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष फारुक शाब्दि व माजी आमदार वारिस पठाण या नेत्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांना एमआयएम पक्ष आणि महाराष्ट्रातील संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने आरक्षणाच्या लढायला पाठिंबा दिला आहे.
या पाठिंबा नंतर माध्यमांशी बोलताना शाब्दि यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाज कायमच मराठा समाजाच्या पाठीशी राहिलेला आहे असे सांगताना आरक्षणाच्या या लढाईत आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू आणि मुंबईमध्ये आलेल्या मराठा बांधवांसाठी सर्व सुविधा आणि इतर सोयी देण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे शाब्दी यांनी सांगितले.