साहेब, सोलापूरकरांना गणेशोत्सव विसर्जनपूर्वी शब्द दिलाय ; पालकमंत्री गोरे यांनी फडणवीसांकडे काय मागितले
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सदनिका वाटप कार्यक्रमात विकासाच्या बऱ्याच गप्पा झाल्या. विजयकुमार देशमुखांनी उद्योग, आयटी पार्क मागितले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा आपल्या भाषणांमध्ये पालकमंत्री झाल्यानंतर सोलापूरच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही प्रमुख मागण्या केल्या. सोलापूरची समांतर जलवाहिनी झाली दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे परंतु वितरण प्रणाली जुनी असल्याने त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती त्यालाही मंजुरी मिळाली आहे असे सांगत सोलापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचा विषय तातडीने प्रशासन पातळीवर मार्गी लावावा अशी ही मागणी त्यांनी केली.
त्यामध्ये विशेष करून सोलापूर मुंबई विमान सेवेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
सोलापूर गोवा ही विमान सेवा सुरू झाली आता सोलापूरकरांना मुंबईसाठी विमानसेवा हवी आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी सुद्धा मिळाली आहे पण माझ्या तोंडून सोलापूरकरांना गणेशोत्सव विसर्जनपूर्वी सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू होईल असा शब्द गेला आहे त्यासाठी आपण तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली. पहा काय म्हणाले पालकमंत्री गोरे..