सोलापुरात झाला अनोखा नॉन स्टॉप स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड ; विनर्स स्केटिंग फाऊंडेशनचा उपक्रम
१५ ऑगस्ट भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विनर्स स्केटिंग फाऊंडेशन स्केटिंग क्लब सोलापूर यांच्या वतीने दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात सोलापूरातील खेळाडूंकरिता ७९ मिनीट नॉन स्टॉप स्केटिंग मॅरेथॉन वर्ल्ड रेकॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेकॉर्डमध्ये वय वर्ष ४ ते १८ या वयोगटातील ५२ खेळाडूंनी उत्साहाने भाग घेऊन देशाचा स्वातंत्र्य उत्सव अनोख्या पध्दतीने साजरा केला. यावेळी रेकॉर्डचे उद्घाटन दिपक भैय्या घंटे व सम्यक मोहोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दयानंद महाविदयालयाचे प्रशासक श्री उबाळे सर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
सहभागी खेळाडूंची नावे युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, जिनीयस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, यु एन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना स्वतःच्याच पालकांच्या हस्ते यशस्वीरित्या रेकॉर्ड पूर्ण केल्याबद्दल पदक देऊन गौरविण्यात आले. सदरील रेकॉर्ड यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी क्लबचे प्रशिक्षक श्री सागर राठोड, सिध्दू सुतार व सर्व पालकांनी परिश्रम घेतले.
सदरील रेकॉर्डमध्ये संयुक्ता पोतदार, वेदांत कोठारी, देवांश सरवदे, उत्तरा पोतदार, विनायक हुच्चे, लास्या शेरला, वसुधा सब्बन, विराज अरकाल, तन्मय तगडेकर, सृशांक कटारे, विश्वा बिटला, प्रणव पलनाटी, सोहम टंगा,
सोहम गाडे, आरोही गाडे, आदित्य तेल्लुर, हर्षा सब्बन, असद शेख, सिध्दांत फुलारी, वेदांत फुलारी, वेदांत गुंटुक, असित कांबळे, स्वयम सोमशेट्टी, भ्रमरा गालपल्ली, निर्भय कोरे, ओवी सिध्दे, प्रद्युम्न बिराजदार, सायुज्य क्षिरसागर, गंगा नादरगी, सुरज कुडक्याल, रवी शेरसिंह, चैतन्यतेजस बल्ला, ध्रुव साळुंखे, शौर्य शिलवंत, आर्य शिलवंत, सर्वेश जिणगे, शौर्य कदम, प्रथमेश चौगुले, अथर्व कन्ना, स्नेहा बोकडे, स्वराली काळे, स्वानंदी काळे, याहया शेख, निशा सरवदे, मुग्धा सावंत, वर्षा मुलगे, उत्कर्षा साका, धैर्यशील साका, सारंग मठपती, जतीन दुडम, मोहम्मद साद शेख, आर्याही क्षिरसागर यांनी सहभाग नोंदविला.