नियोजन विभागाकडून सोलापुरात झालेल्या कामांच्या तपासण्या ; नियोजन उपायुक्त सोलापूर दौऱ्यावर
सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निधीतून झालेल्या कामांची तपासणी केली जात असून राज्याचे नियोजन उपायुक्त संजय मरकळे ते सोलापूर दौऱ्यावर आहेत. अक्कलकोट तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये जाऊन त्यांनी विविध कामांची पाहणी केली.
अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेला भेटी देऊन शाळा खोली, शौचालय बांधण्यात आलेले शौचालय याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी ही त्यांचे जोरदार स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, बांधकाम विभागाचे उपअभियंता उषा बिटला, राजेश खांडेकर यांचा समावेश होता.
दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच सुरेश अर्जुन, चेअरमन रविकांत बगले, माजी उपसरपंच नागनाथ पाटील, देविदास कोळेकर, पत्रकार अनिल कापसे, ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंजा, मुख्याध्यापक वसंत भिसे, सुनील कोळी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शाळेचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.