खासदार प्रणिती शिंदे आहेत संपर्कात ; उत्तराखंड ढगफुटीवर काय दिली माहिती वाचा
सोलापूर : उत्तराखंड राज्यांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अचानक नद्यांना पूर आला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे आलेल्या अचानक पुरामुळे संपूर्ण गाव वाहून गेल्याचे दिसून आले त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. देशभरातून फिरायला गेलेले पर्यटक अडकल्याची माहिती मिळत असून सोलापुरातील धीरज बगले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी, मल्हारी धोत्रे हे चौघे उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती मिळाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली.
दरम्यान सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या उत्तराखंड राज्यात ज्या ठिकाणी ढगफुटी झाली त्या भागातील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या संपर्कात आहेत. या घटनेवर खासदार प्रणिती शिंदे यांनी माहिती दिली की, सोलापूर जिल्ह्यातील उत्तराखंड या ठिकाणी गेलेले पर्यटक पुजारी आणि बगले यांच्या कुटुंबीयांशी सुद्धा संपर्क साधला आहे.
उत्तराखंडमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे. हा आपणासाठी एक प्रकारे दिलासा आहे पण ज्या भागात ढगफुटी झाली त्या भागातील सर्व यंत्रणा बंद असल्याने कुणाशीही संपर्क होऊ शकत नाही. सोलापुरातील अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी आपण तिथल्या यंत्रणेची कायम संपर्क ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.


















