सोलापुरात आमदार देवेंद्र कोठेंचा काँग्रेसला धक्का ; युवा चेहऱ्यांसह माजी नगरसेविका पतीसह भाजपात
सोलापूर : एकीकडे देशात ऑपरेशन सिन्दुर वरून भाजप आणि काँग्रेस पक्षात जुंपली असतानाच सोलापुरात भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी काँग्रेसला जोरदार धक्का दिला असून काँग्रेसच्या खासदार ताईंचे कट्टर समर्थक युवा नेत्यांसह काँग्रेसच्या माजी नगरसेविकेने आपल्या पतीसह भाजपात प्रवेश केला आहे.
आमदार देवेंद्र कोठे यांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी होती. या कार्यक्रमात युवक काँग्रेस नेते श्रीकांत वाडेकर यांनी भाजपचा शेला गळ्यात घेतला. पोलिस मुख्यालय भागात वाडेकर यांचे मोठे वलय आहे. हा काँग्रेसला धक्का मानला जात आहे.
तसेच काँग्रेसच्या माजी नगरसेविका सारिका सुरवसे यांनी सुद्धा काँग्रेस पक्ष सोडून आपले पती सतीश सुरवसे यांच्या सह जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.