लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे अभिवादन
समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनाचे वास्तव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मांडून त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला त्यांनी आपल्या शाहिरी बाण्याने स्फूरण दिले.साहित्य, संगीत आणि सामाजिक कार्याच्या जगातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व, ज्यांनी उपेक्षित समुदायांच्या संघर्षांना संबोधित करण्यासाठी आपल्या परखड लेखणीचा वापर केला.
असे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या आज जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, अल्पसंख्यांक राष्ट्रीय सरचिटणीस फारुक मटके सर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख व्हीजेएनटी अध्यक्ष रुपेश भोसले सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर ओबीसी सेलचे अध्यक्ष अनिल छत्रबंद ओबीसी कार्याध्यक्ष आयुब शेख विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबाजीराजे सोशल मिडीया अध्यक्ष वैभव गंगणे रिक्षा संघटना अध्यक्ष महिपती पवार दत्तात्रय बनसोडे युवक उपाध्यक्ष यशराज डोळसे सुरेखाताई घाडगे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.