राजन पाटलांनी काढता पाय घेतला ; शहराच्या फोटोमध्ये आपण बसत नाही, चला निघा
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले. सोलापूर शहरात बदलाचे वारे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात त्यांचे सर्वच कार्यकर्त्यांनी भव्यदिव्य स्वागत केले.
शहराचे अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी शहर पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठेवला होता. हुतात्मा स्मृती मंदिराच्या परिसरात भव्य मोठे असे अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे डिजिटल आणि भला मोठा हार लावून मोठ्या स्टेजवर तटकरे यांच्या सत्काराचे नियोजन त्यांनी केले होते.
तटकरे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यानंतर त्यांना पवार, बागवान यांनी स्टेजवर घेऊन गेले. तटकरे यांच्या सोबतच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने तसेच माजी गटनेते किसन जाधव, माजी गटनेते आनंद चंदनशिवे हे दोन्ही नेते स्टेजवर गेले.
फोटोमध्ये येण्यासाठी शहरातील नेत्यांची धडपड दिसून आली. त्यामध्ये सर्वात पहिले स्टेजवर आलेले राजन मालक एका कोपऱ्यात ढकलले गेले. शहरातील प्रमुख नेत्यांना हे दिसताच त्यांनी तटकरे यांच्या जवळ मालकांना बोलवून घेतले. तिथल्या सत्काराच्या केक कापण्याच्या गोंधळात मालक मागेच राहिले तो गोंधळ पाहून यशवंत तात्या आणि मालक या दोघांनी खाली निघून जाणे पसंद केले.