केतन वोरा यांच्याकडून डॉ. मोहन भागवत यांचा सत्कार
सोलापूर येथील उद्योग वर्धीनीच्या परिवार उत्सव कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच झाले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद होते.
यावेळी चंद्रिकाबेन चौहान यांच्यासह उद्योग वर्धिनीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राम रेड्डी, डॉ. सुहासिनी शाह, वासुदेव बंग, डॉ. माधवी रायते, केतन वोरा, आनंद जोशी आणि धीरेन गडा उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केतन वोरा मित्र परिवाराने मोठे योगदान दिले. मोहन भागवत यांचे हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रवेशद्वारावर आगमन होताच केतन वोरा यांनी त्यांचे स्वागत करीत सत्कार केला.




