कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची बदली ; राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर नियुक्ती
सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची बदली झाली असून त्यांना राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूरच्या कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
संतोष कुलकर्णी यांना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबद्दल त्यांची बदली झाली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कामकाज करताना एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. टेक्निकल बाबतीत त्यांचा हात जिल्हा परिषदेमध्ये कोणीच पकडत नव्हते. नुकत्याच झालेल्या आषाढी वारीमध्ये सुद्धा त्यांनी प्रशासनाच्या सोबतीला झोकून देऊन काम केल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमास त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. क्रीडा विभाग सांस्कृतिक विभागात त्यांनी आपली छाप सोडली. एक चांगला गायक म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या कार्यालयामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय कौटुंबिक वातावरण ठेवले होते.