

‘जयाभाऊ’ तुस्सी ग्रेट हो ! वारकऱ्यांना पहिल्यांदाच हायटेक सुविधा
सोलापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदाच्या आषाढी वारीमध्ये अतिशय झोकून देऊन काम केले. त्यामुळे ही वारी आणि वारकऱ्यांना पहिल्यांदाच अशा हायटेक सुविधा मिळाल्याचे पाहायला मिळाले. या वारीमध्ये जर्मन हँगर ही नवीन मंडप संकल्पना आणली. त्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे.
राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज समितीच्या मंत्रीपदानंतर जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक कार्यक्रमात ज्या आषाढी वारीमध्ये आपण माऊलींच्या दर्शनासाठी जात होतो पण गर्दीमध्ये दर्शन होत नव्हते अशा या आषाढी वारीचे नियोजन करण्याचे भाग्य पालकमंत्री म्हणून मला मिळाले याचा आनंद होत असल्याचे सांगितले होते. त्या शब्दाला जागताला जयकुमार गोरे यांचे 2025 सालची आषाढी वारी हायटेक सुविधा देऊन करून दाखवली.
गोरे यांनी स्वतः पंढरपूर आता जातीने लक्ष घातले होते. यांना त्यांनी स्वच्छतेवर सर्वाधिक भर दिल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन वारकऱ्यांची विचारपूस केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेने जेव्हा जेव्हा निधी मागीतला त्यांनी तातडीने निधी मंजूर करून देत मान्यता सुद्धा तितक्याच लवकर दिल्या.
वारकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ नये याची पुरेपूर काळजी प्रशासनाने घेतल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्री गोरे यांनी जर्मन हँगर ही मंडप संकल्पना या वारीत राबवली. त्यामुळे भाविक शेड खाली सावलीमध्ये आराम करताना पाहायला मिळाले. त्याच ठिकाणी त्यांना वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती.
स्वच्छ पाण्याची सोय, स्वच्छतागृहांची सोय, महिला वारकऱ्यांसाठी स्नानगृह, हिरकणी कक्ष, पायी चालून दमलेल्या वारकऱ्यांसाठी चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष याच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली.
आषाढी एकादशीच्या आजपर्यंतच्या इतिहासात तब्बल 28 ते 30 लाख भाविक या आषाढी वारीत पंढरपूरमध्ये आल्याची नोंद ए आय टेक्नॉलॉजीमुळे झाली. आषाढी वारीमध्ये उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा पावसाळी अधिवेशनात अभिनंदनचा ठराव करण्यात आला. ही सुद्धा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल.