काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन
सोलापूर : विजापूर नाका मशीद जवळ दि.१६.०२.२०२३ रोजी आमिर खान पठाण याचा लाकडी दांडक्याने डोक्यात मारून खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला आरोपी सागर मोहन चंदनशिवे, रा. सोलापूर याची मुंबई उच्च न्यायालयाने जामीनवर मुक्तता केली.
आरोपी सागर याची नोकरी आरोपी आमिर खान याने मालकाकडे खोटे नाटे सांगून घालवली या कारणातून आलेल्या वैमनस्यातून घटने दिवशी मयत आमिर खान हा दारू पीत बसलेले असताना त्याचा आरोपी सागर याने डोक्यात लाकडी दांडका मारून खून केला या आरोपावरून विजापूर नाका पोलिसांनी आरोपी सागर यास अटक केली होती. आरोपीचा जामीन अर्ज सोलापूर सेशन कोर्टाने नामंजूर केल्यानंतर आरोपीने ॲड. जयदीप माने याचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला होता.
तथाकथित नेत्र साक्षीदार राजेंद्र गायकवाड याने पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना चार दिवस घटनेची कोठेही वाच्यता केली नाही त्यामुळे त्याच्या जबाबावर संशय निर्माण होतो त्यामुळे त्याच्या जबाबावर विश्वास ठेवणे धोक्याचा आहे असा युक्तिवाद ॲड. जयदीप माने यांनी उच्च न्यायालयात केला. सरकारतर्फे ॲड. एस. एस. चौधरी यांनी काम पाहिले