बनावट मृत्युप्रमाणपत्र करून बांधकाम कार्यालयाची फसवणूक ; सोलापुरात पाच जणांवर गुन्हा
बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर वारसाला मिळणाऱ्या दोन लाख अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट मृत्यु प्रमाणपत्र करून आर्थिक लाभ घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध सोलापुरात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संतोषसिंग ज्ञानोबासिंग राजपूत दुकान निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शोभा काशिनाथ वाघमारे रा-सोहाळे मोहोळ सोलापूर, मनोज रतनलाल अवस्थी, रा-१४४ शामा नगर मोदी सोलापूर, शैला सुरेश भांगे-रा लक्ष्मी गल्ली अ.कोट सोलापूर, सुनिता संजय कोळी, रा-२८८ मुंकुद नगर भवानी पेठ सोलापूर, वैशाली नागनाथ जेऊरे, रा-२५ कामगार वसाहत भाग-१ सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पोलिसांच्या प्रेस नोट मधून समोर आली आहेत.
अरोपीत मजकूर यांनी बांधकाम कामगाराच्या योजना क्रमांक एफ ०२ नोदणी बांधकाम कामगाराच्या नैसर्गिक मृत्यु झाल्यास वारसास २ लाख रूपये इतके अर्थसहाय्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट मृत्यु प्रमाणपत्र बनवून ती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कामगार कल्याण केंद्र सोलापूर या कार्यालयास ऑनलाईन सादर केली. त्यापैकी १) काशिनाथ जयवंत वाघमारे २) वनमाला मनोज अवस्थी ३) सुरेश संगनप्पा भांगे यांनी दोन लाख असे एकूण ६ लाख रूपये रक्कम प्राप्त करून शासनाची फसवणुक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत