
कुलदीप-कोहिनकरांच्या जोडगोळीने यंदाची वारी झाली लयभारी ; जय’कुमारां’ची खंबीर साथ, सीएम कडून कार्याची दखल
सोलापूर : आषाढी वारी म्हणजे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनाच्या कामाची कस लागते. त्यातल्या त्यात नव्याने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी असतील तर त्यांच्यासाठी ही वारी एक चॅलेंज आणि काम चांगले करण्याची पर्वणी असते. अधिकारी या मध्ये किती मन लावून काम करतो याची सुद्धा दखल घेतली जाते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची ही पहिलीच वारी. जंगम यांनी वारकऱ्यांच्या सेवेत कुठेही कसर ठेवली नाही. त्यांना अनुभवी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची साथ लाभली. कोहिनकर यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात दोन वाऱ्या केल्याचा दांडगा अनुभव त्यांना आहे.
वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलाची सेवा हेच ब्रीद वाक्य घेऊनच यंदाची आषाढी वारी संपूर्ण जिल्हा परिषदेने पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले.
सीइओ जंगम यांच्या पत्नी डॉ तेजस्विनी जंगम या सुद्धा वारीत सहभागी होऊन त्यांनी वारकरी माऊलींची सेवा केली. संत गजानन महाराज तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत त्या सहभागी झाल्या होत्या.
आषाढी वारीमध्ये जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, महिला बालकल्याण, ग्रामपंचायत विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्यावर मोठी जबाबदारी असते. आषाढी वारी दरम्यान सर्व संतांच्या पालखी मार्गावर भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठी जबाबदारी जिल्हा परिषद पार पाडते.
जिल्हा परिषदेने यंदा शेकडो किलोमीटर पायी चालत येणाऱ्या वारकरी माऊलींसाठी फूट मसाज ही नवीन संकल्पना राबवली त्यामुळे वारकऱ्यांनी याचे मनापासून स्वागत केले स्वतः सीईओ कुलदीप जंगम यांनी प्रत्येक वारकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली त्यांच्याशी चर्चा केल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे राज्याचे ग्रामविकास मंत्री असल्याने प्रत्येक बाबतीत जातीने लक्ष घातले होते. त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले त्यांच्या सोबतीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे होते. कोहीनकर यांनी या वारीत मोठी जबाबदारी घेत कुठेही जिल्हा परिषदेच्या कामात कसर पडू दिली नाही.
सीइओ जंगम यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त सीइओ कोहिनकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, संजय घनशेट्टी, आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ नवनाथ नरळे यांनी आपली जबाबदारी चोख बजावली.
सोलापूर जिल्हा परिषदेने यावेळी वारकऱ्यांसाठी निवारा, मोबाईल चार्जिंग स्टेशन, लाईव्ह दर्शन, हिरकणी कक्ष, स्नानगृह
स्वच्छतागृह, प्रथमोपचार कक्ष, नियंत्रण कक्ष
चरण सेवा, उद्घोषणा कक्ष सुविधा दिल्या. याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. आपल्या भाषणामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.