राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
कार्यक्षम शासनकर्त्या, राष्ट्रनिर्मात्या, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी नगरसेविका नुतन गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, जेष्ठ नेते श्रीनिवास कोंडी, हेमंत चौधरी, जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सलिम नदाफ, अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख सहकार अध्यक्ष भास्कर आडकी चित्रपट सांस्कृतिक सेल अध्यक्ष अशितोष नाटकर सोशल मिडीया अध्यक्ष वैभव गंगणे ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंद ओबीसी कार्याध्यक्ष अय्युब शेख वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी रिक्षा चालक मालक सेल महपती पवार सेक्रेटरी दत्तात्रय बनसोडे प्रज्ञासागर गायकवाड सुरेखाताई घाडगे कविता पाटील संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. प्रजेच्या सुखासाठी अहिल्यादेवींनी दानधर्माच्या माध्यमातून अनेक चांगली कामे केली. जी आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत उभी आहेत. त्यांनी प्रजाहितदक्षतेचा प्रेरणादायी वारसा आपल्याला दिला आहे.